मुरबाड नगरपंचायतीला केंद्रीय कचरामुक्त शहाराचे स्टार मानांकन प्राप्त

मुरबाड - केंद्रीय पातळीवर भारतातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केले. या रेटिंगमध्ये देशातील ७० शहरांना वनस्टार

 मुरबाड – केंद्रीय पातळीवर भारतातील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केले. या रेटिंगमध्ये देशातील ७० शहरांना वनस्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या शहरांच्या यादीत आपल्या मुरबाड नगरपंचायतीने स्थान पटकावले आहे.

कोकण विभागातील ५१ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एकुण ९ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना हे वनस्टार मानांकन प्राप्त झाले आहे. यात मुरबाड नगरपंचायतीचा समावेश आहे.

 “मुरबाड नगरपंचायतीचे हे यश समस्त मुरबाडकरांच्या सहकार्यामुळेच मिळाले आहे.” अशी मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांनी यानिमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.तसेच यावेळी त्यांनी मुरबाड शहरवासीयांचे आभार मानले.