ttwo wheeler theft murbad

मुरबाड: अवघ्या दोन दिवसांत दुचाकी चोरणाऱ्या(motorcycle theft) चोरट्याच्या मुरबाड पोलिसांनी(murbad police) मुसक्या आवळल्या असून चोरलेल्या दोन मोटारसायकली(two motorcycles seized) पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

मुरबाड शहरातील सोनारपाडा व विद्युत महावितरण कंपनीच्या परिसरातून प्रदिप मुकणे या मोटारसायकल चोराने १० ऑक्टोबरला दोन मोटारसायकली चोरल्या होत्या. तक्रार दाखल झाल्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सहाय्यक तडवी पोलीस हवालदार रामा शिंदे,जयवंत मोरे ,अमोल माळी यांनी अवघ्या दोनच दिवसांत या मोटारसायकल चोराला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.