लॉकडाऊनमध्ये भाजीपाला वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची आता भातपिकावर मदार, मशागतीच्या कामाला सुरुवात

मुरबाड: लॉकडाऊनमुळे भाजीपाला पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेव उपजीविकेचे साधन असलेल्या भातपीकावर आपले लक्ष केंद्रित केले असुन शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. मुरबाड तालुक्यात

 मुरबाड: लॉकडाऊनमुळे भाजीपाला पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेव उपजीविकेचे साधन असलेल्या भातपीकावर आपले लक्ष केंद्रित केले असुन शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे.

मुरबाड तालुक्यात भातपीकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.या बरोबर काही शेतकरी भेंडी,मीरची, वांगी, टॉमेटो, काकडीची पिके घेतात.लॉकडाऊनमुळे भाजीपाला पिकांना बाजारपेठा उपलब्ध न झाल्याने हा उभा भाजीपाला शेतातच पिकुन वाळला.हातचे हे पिक गेल्यानंतर आता एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या भातपिकावर शेतकऱ्याची मदार आहे.मुरबाड तालुक्यात पंधरा हजार नऊशे सत्तर हेक्टरवर भातपिकाची लागवड केली जाते.तालुक्यात रत्ना, हलवार, जया, टायचून, महाडी, झिनी, मसूरा अशी पिके घेतली जातात.वर्षभर कुटुंबासाठी पुरेल इतके भात भरडुन उर्वरित भात विकून त्यातून शेतकरी चरितार्थ चालवतात. लॉकडाऊनमध्ये शेतीजोडधंदेही बंद आहेत, त्यामुळे शेतीची राबणी (शेतात पालापाचोळा,गवत शेण, कचरा टाकून तो जाळणे, त्यामुळे गवत उगवत नाही) ऊखळणी, बांधबंदिस्ती अशा कामांकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.शेतकरी सध्या संकटात आहे, भातपीक उत्पादन निघाले तर भविष्यातील संकट दूर होईल, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना खते आणि बी, बियाणे मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याची मागणी गणपत कराळे यांनी केली आहे.