मुरबाडच्या निवारा केंद्रात मजूर महिलेची प्रसुती

मुरबाड: परभणीकडे चाललेले बेचाळीस मजूर मुरबाडच्या कुणबी भवनमध्ये निवारा केंद्रात थांबले आहेत.यातील एका मजूर महिलेची बुधवारी रात्री प्रसूत झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.बाळ आणि

 मुरबाड: परभणीकडे चाललेले बेचाळीस मजूर मुरबाडच्या कुणबी भवनमध्ये निवारा केंद्रात थांबले आहेत.यातील एका मजूर महिलेची बुधवारी रात्री प्रसूत झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असुन सध्या मुरबाड ग्रामीण रुग्णालयात त्यांची देखभाल सुरू आहे.

मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने या मजुरांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यांच्या आरोग्याबाबत त्यांना योग्य समुपदेशन केले जात आहे.गुरुवारी मुरबाड तहसीलदार अमोल कदम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नगरसेवक मोहन सासे यांच्या उपस्थितीत मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक अर्चना भालेराव यांनी या मजुरांना कोरोनाबाबत घ्यावयाच्या खबरदारीचे मार्गदर्शन केले. सध्या या ठिकाणी ४२ मजुर होते. त्यात एका चिमुकल्या पाहुण्याची भर पडली आहे.