मोहने आदिवासी पाड्यात एका महिलेची तिच्या नवऱ्याने केली हत्या

कल्याण : मोहने येथील आदिवासी पाड्यात एका महिलेची तिच्या नवऱ्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. जेतवननगर विभागातील आदिवासी पाडा येथे राहत असणारे बाळू खरात व त्यांची पत्नी शालन आपल्या कुटुंबियांसमवेत

कल्याण : मोहने येथील आदिवासी पाड्यात एका महिलेची तिच्या नवऱ्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. जेतवननगर विभागातील आदिवासी पाडा येथे राहत असणारे बाळू खरात व त्यांची पत्नी शालन आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. मात्र रात्री झोपेतच तिच्या पतीने तिला मारले असल्याचा आरोप तिच्या बहिणीने  खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केला आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार यांंच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान खडक पाडा पोलीस स्टेशन मध्ये ३०२ कलमाद्वारे हत्या करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधला असता आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.