व्यावसायिक वादातून साथिदाराची हत्या; आरोपीला १० दिवसांनी शिताफीने केली अटक

कल्याण रेल्वे स्थानकातील (Kalyan railway station) फलाट (platform) क्रमांकवर एका इसमाचा खून (Murder) करून पळालेल्या आरोपीला सोमवारी गजाआड करण्यात आले. सदर कारवाई रेल्वे गुन्हे प्रकटीकरण शाखा-२ च्या पथकाने (Railway Crime Disclosure Branch-2) केली.

  कल्याण (Kalyan).  कल्याण रेल्वे स्थानकातील (Kalyan railway station) फलाट (platform) क्रमांकवर एका इसमाचा खून (Murder) करून पळालेल्या आरोपीला सोमवारी गजाआड करण्यात आले. सदर कारवाई रेल्वे गुन्हे प्रकटीकरण शाखा-२ च्या पथकाने (Railway Crime Disclosure Branch-2) केली. सूरज (पूर्ण माहिती नाही) या आरोपीला पुढील तपासासाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे तपासी पथकाने सांगितले.

  ३ जुलै रोजी फलाट क्रमांक एक येथे एक इसम रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. सदर इसमाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करण्याचे आदेश मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिले. त्यानुसार रेल्वे गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके तपास करू लागले.

  तपासादरम्यान रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ते कसारा तसेच खोपोली, पनवेल, इगतपुरी, नाशिक, भुसावळसह पश्चिम रेल्वे मार्गावरील चचर्गेट ते बोर्डी रेल्वे स्थानक परिसरात आरोपीचा शोध घेऊ लागले. तपास सुरू असताना आरोपी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शनास पडताच सूरजच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

  प्लास्टिकच्या बाटल्यावरून घडला गुन्हा
  आरोपी व मृत हे रेल्वे रुळावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्याचे काम करतात. बाटल्या गोळा करण्याच्या वादातून आरोपी सूरज याने इसमाच्या मानेवर वार केला, अशी माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली.

  तपासी पथक
  या गुन्ह्याचा तपास मध्य परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे गुन्हे शाखा २ चे पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मांजरेकर, हवालदार अतुल साळवी, अतुल धायडे, संदीप गायकवाड, मिलिंद भोजने, किशोर करपे, रविंद्र दरेकर, पोलीस नाईक राजेश कोळशे, अमित बडेकर यांनी केली आहे.