पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण करण्याची प्रकाश भोईर यांची आयुक्तांकडे मागणी

कल्याण: पुढच्या महिन्यापासून पावसाळा सुरु होणार असल्याने कल्याण डोंबिवली हद्दीतील नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते तथा मनसे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक प्रकाश

कल्याण: पुढच्या महिन्यापासून पावसाळा सुरु होणार असल्याने कल्याण डोंबिवली हद्दीतील नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते तथा  मनसे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक प्रकाश  भोईर यांनी पालिका आयुक्त डॉ.  विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच नागरिकांना साथीचे रोग होण्याची शक्यता आहे. आधीच कोरीना व्हायरसमुळे आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत असताना पावसाळ्यात त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण पडेल. पालिका प्रशासनाने वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन नालेसफाई व रस्त्यावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून पालिकेकडे पाठपुरावा करत असतो. त्यामुळे माझ्या या मागणीकडे लक्ष द्यावे, अशा आशायाचे पत्र कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना मनसे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिले आहे.