लोक तडफडून मरत आहेत, आतातरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून कारभार करावा – नरेंद्र पवार

कल्याण : कोरोना विषाणूच्या मुक्तीसाठी गेल्या ३ महिन्यांपासून राज्य सरकारने कोणतीही ठोस धोरण अवलंबले नाही. स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह

कल्याण : कोरोना विषाणूच्या मुक्तीसाठी गेल्या ३ महिन्यांपासून राज्य सरकारने कोणतीही ठोस धोरण अवलंबले नाही.  स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे. राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातील गरिबांना रेशनधान्य मिळत नाही, उलट त्यामध्ये घोटाळे सुरू आहेत. यासोबतच राज्यातील आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सातत्याने रुग्णसंख्या लपविली जात आहे, कोरोनाने बाधित मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले. राज्यातील ११ कोटी जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही करावी आणि लोक रस्त्यावर तडफडून मरत आहेत. आतातरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून कारभार करावा असे म्हणत भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी सरकारबद्दल निषेध व्यक्त केला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना करत नाही. देशातील इतर राज्ये विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवुन राजकारण करत आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यातील रोजंदारी मजूर, शेतकरी व बारा बलुतेदार यांच्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी नरेंद्र पवार यांनी केली.