लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या – माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण : कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी देशासह राज्यभरात लॉकडाऊन केला होता. मात्र अत्यावश्यक सेवा देणारी किराणा, मेडिकल आदी अनेक दुकाने या काळातही सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली होती. प्रशासनाने

कल्याण : कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी देशासह राज्यभरात लॉकडाऊन केला होता. मात्र अत्यावश्यक सेवा देणारी किराणा, मेडिकल आदी अनेक दुकाने या काळातही सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली होती. प्रशासनाने घालून दिलेले नियम व सूचना पाळून ती दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होती मात्र काही ठिकाणी अनपेक्षितपणे नागरिकांनी गर्दी केल्याने काही छोटे दुकानदार व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी काळात त्यांना अडचणी येऊ शकतात. याचा विचार करून लॉकडाऊन काळात दुकानदार व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे देण्यात यावे अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. कोरोनासारख्या महामारीला घाबरून न जाता उलट त्यांनी जनतेच्या सेवेसाठी प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य केले आहे. त्यांच्यावर अन्याय करू नये यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.