आमदार नरेंद्र पवार यांनी होलीक्रॉस रुग्णालयाला भेट देऊन कोरोना रुग्णांचा घेतला आढावा

कल्याण : कल्याण पश्चिममधील होलीक्रॉस रुग्णालयाला भेट देऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कोरोना रुग्ण व डॉक्टरांची चौकशी केली. कल्याणमधील कोरोना रुग्णांवर होलीक्रॉस येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टर व

कल्याण : कल्याण पश्चिममधील होलीक्रॉस रुग्णालयाला भेट देऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कोरोना रुग्ण व डॉक्टरांची चौकशी केली. कल्याणमधील कोरोना रुग्णांवर होलीक्रॉस येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टर व परिचारिका व कोरोना योद्धे कसोशीने प्रयत्न करून रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्याच्या अनुषंगाने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी होलीक्रॉस येथे भेट देऊन डॉक्टर व इतर कोरोना योद्ध्यांची चौकशी केली. यासोबतच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचारासंदर्भातही विचारपूस केली. पी पी ई किट, मास्क व इतर काळजी घेण्याच्या गोष्टीही ते डॉक्टरांना तातडीने उपलब्ध करून देणार आहे. या लढाईमध्ये खऱ्या अर्थाने झोकून देऊन डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय घटक लढत आहेत. कोणत्याही अडचणी आल्या किंवा मदत लागली तर सांगा, निश्चितपणे मदत करेन. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे, शून्य कोरोना रुग्ण कल्याण आपल्याला करायचे आहे, असे पवार डॉक्टरांना म्हणाले.