नवी मुंबई शहराची पाऊले अनलॉकच्या दिशेने ; नाट्यगृह, जलतरण तलाव व सभागृह, सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रपट गृहे होणार सुरू 

लसीकरणाचा परिणाम शहरात दिसू लागला आहे. वेगात होत असलेल्या लसीकरणाने कोरोनाचा आलेख उतरू लागला आहे. अद्यापही तिसऱ्या लाटेची भीती कायम असली तरी; शहराची लोक्ससंख्येची घनता पाहता लहान।मुलांसह अनेकांना कोरोना होऊन गेलेला असल्याची शक्यता असून हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे मत तज्ञ वर्तवत आहेत.

    सिद्धेश प्रधान/ नवी मुंबई :  दुसऱ्या लाटेचा ओसारता आलेख, लसीकरणाने पकडलेला वेग पाहता नवी मुंबईतील विविध मनोरंजनाची साधने खुली करण्यास आयुक्त बांगर यांनी सशर्त परवानगी दिली आहे. २२ ऑक्टोबरपासून मनोरंजनाची ठिकाणे सुरू होणार आहे. मात्र हे सुरू करताना राज्य शासनाने घालून दिलेले निर्बंध कायम राहणार असले तरी नवी मुंबईची वाटचाल अनलॉकच्या दिशेने सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

    लसीकरणाचा परिणाम शहरात दिसू लागला आहे. वेगात होत असलेल्या लसीकरणाने कोरोनाचा आलेख उतरू लागला आहे. अद्यापही तिसऱ्या लाटेची भीती कायम असली तरी; शहराची लोक्ससंख्येची घनता पाहता लहान।मुलांसह अनेकांना कोरोना होऊन गेलेला असल्याची शक्यता असून हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे मत तज्ञ वर्तवत आहेत.

    घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडून शासनाने नागरिकांना दिलासा दिला होता. त्यात आता पालिकेने शसनाने आखून दिलेल्या नियमांनुसार नाट्यगृह, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, सभागृह सुरू करण्यास व मोकळी मैदाने वापरण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर शहर मोकळा श्वास घेणार आहे.

    कोविडमुळे सर्वच कला, क्रीडा, सांस्कृतिक व धर्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशासह नवी मुंबईतील उत्साह देखील मावळला होता. पहिली लाट ओसरल्यावर देखील पालिकेने शासनाच्या आदेशानुसार पुन्हा अनलॉकला सुरुवात केली होती. मात्र बेशिस्त नागरिकांकडून होत असलेल्या कोविड नियमांच्या उल्लंघनाने शहर पुन्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेत ढकलले गेले. त्यामुळे सुरू झालेल्या सर्वच मनोरंजनाच्या बाबींवर पलीकेला कठोर निर्बंध घालावे लागले होते.

    मात्र जसजसे लसीकरणाचा कार्यक्रम वेग घेऊ।लागला तसतसा कोविडचा आलेख देखील खाली येऊ लागल्याने शासनाने सर्वच स्थानिक पातळीवर त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा घालून दिली आहे. त्यानुसार पालिकेने सर्व मनोरंजनाची स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे

    तिसऱ्या लाटेचा धोका कायम

    अद्यापही १ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यात लसीकरण झालेले नागरिक हे बिनधास्त होऊन बेशिस्तपणे वागत असल्याचे दिसून येत आहेत. हेच नागरिक कोरोनाचे वाहक बनून  १ ते १८ वयोगटातील मुलांपर्यंत संसर्ग पोहोचवण्याची शक्यता अधिक आहे. त्यात सध्या मनोरंजनाची सर्वच ठिकाणे खुली करण्यात आल्याने ही शक्यता अधिक असल्याने तिसऱ्या लाटेचा धोक्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.

    भरारी पथकाची खरी गरज

    सर्वच शहर आनलॉक झाल्याने व काही दिवसांवर दिवाळीसारखा मोठा सण जवळ आल्याने खरेदीसाठी तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. यात तर लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांकडून बेशिस्तपणा वाढत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पलकीने स्थापन केलेली भरारी पथके या शहर अनोलक स्थितीत असताना तैनात होणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालता फिरणे या गोष्टी सर्रास होऊ लागल्याचे पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे शहरातभरारी पथकांकडून अशा बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.

    शासनाने काढलेल्या जी आर नुसार मोकळी मैदाने देखील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुली होत आहेत. ही डेकोरेटर्स व वेडिंग इव्हेंट संस्थांसाठी दिलासादायक बाब आहे. आमचा आर्थिक संकटात सापडलेला व्यवसाय पुन्हा उभारी घेईल. आम्ही शासनाने दिलेले सर्व नियम पाळणार आहोत. नागरिकांनी देखील तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात ठेवून जबाबदारीने वागावे. त्यामुळे आमचे व्यवसाय देखील सुरू राहतील.

    उपाध्यक्ष प्रकाश ढसाळ, नवी मुंबई, वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन

    जलतरण तलाव सुरू होतायत हे ऐकून आनंद झाला. मात्र कोरोनाने खेळाडूंचे नुकसान झाले आहे. सर्व थांबले होते, वय उलटल्यावर त्या त्या वयात होणाऱ्या स्पर्धाच रद्द झाल्याने विक्रमांची वा स्पर्धेत भाग घेण्याची संधी हुकली. मात्र यापूढे अधिक सराव करून स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न करणार आहे.

    जलतरणपटू निल शेकटकर , सानपाडा, नवी मुंबई

    पुन्हा नाट्यगृह सुरू होणार असल्याने व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्याने कलाकार व नाट्यकलावंत सुखावले आहेत. रसिकांचे व कलावंतांचे अतूट नाते आहे. ते टिकवायचे असेल तर मात्र नागरिकांनी देखील शासनाने घालून दिलेले नियम पाळावेत जेणेकरून तिसरी लाट येणार नाही. रसिक नाट्यगृहापर्यंत आले तरच कलावंत जिवंत राहील.

    दिनेश जोशी जिल्हाध्यक्ष , नवी मुंबई चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग