action on man not wearing mask

नागरिकांकडून सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर्याने घेत नवी मुंबई पालिका(navi mumbai corporation special team) क्षेत्रात विशेष दक्षता पथके(team to watch citizens following corona rules) पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे. पोलिसांसह पालिकेची ३१ पथके तयार करण्यात आली असून यात १५५ जण नवी मुंबईकरांवर लक्ष ठेवणार आहेत.

  नवी मुंबई : पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ ऑक्टोबरनंतर एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला आहे. तीन दिवसात १३६, २२५ व ३१८ असा कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत गेल्याचे दिसून आले आहे. नागरिकांकडून सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत.ही बाब अत्यंत गंभीर्याने घेत पालिका क्षेत्रात विशेष दक्षता पथके पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे.

  पोलिसांसह पालिकेची ३१ पथके तयार करण्यात आली असून यात १५५ जण नवी मुंबईकरांवर लक्ष ठेवणार आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

  १५५ जणांचा समावेश असलेली ही विशेष दक्षता पथके कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समर्पित भावनेने काम करणार आहेत. दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे हा पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कोरोनाचा वाढता धोका ओळखून गाफील न राहता कोव्हीड सुरक्षा नियमांचे व त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे.

  - अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

  प्रत्येक विभाग कार्यालय निहाय पोलीसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच पोलीसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे.

  तथापि या कारवाया लोकसंख्येच्या मानाने कमी असल्याने याकडे लक्ष केंद्रीत करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात ५ व्यक्ती अशा १५५ जणांची ३१ विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पथक निर्मिती कार्यवाहीला तातडीने सुरूवात करण्यात आलेली आहे.

  ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये ५ व्यक्ती असे या विशेष दक्षता पथकाचे स्वरूप राहणार असून प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळी १ व रात्री १ अशी २ पथके कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी ५ व्यक्तींची ५ पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत. अशाप्रकारे प्रत्येक शिफ्टमध्ये ५ याप्रमाणे १५ पथके एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणार आहेत.

  विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावर बारीक लक्ष राहणार असून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.