पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी – आता एनएमएमटी घडवणार नवी मुंबईची सफर, खासदार राजन विचारेंच्या मागणीला आयुक्तांकडून हिरवा कंदील

नवी मुंबईत(navi mumbai)देखील अनेक पर्यटक हे शहर(navi mumbai darshan) अनुभवण्यासाठी येतात. (NMMT to start buses for navi mumbai darshan)अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व कमी खर्चात व्हावा यासाठी तसेच पर्यटकांसाठी नवी मुंबई(navi mumbai) अनुभवण्यास मिळावी यासाठी बस सेवा सुरु करण्याची मागणी खासदार राजन विचारे(MP rajan vichare) यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई: खाडी किनारा लाभलेल्या नवी मुंबईला उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. त्यानुसार अनेक प्रसिद्ध उद्याने व टेकड्य देखील नवी मुंबईत आहेत. यासह अनेक स्थळे विकसित होत आहेत. नवी मुंबईतदेखील अनेक पर्यटक हे शहर अनुभवण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व कमी खर्चात व्हावा यासाठी तसेच पर्यटकांसाठी नवीमुंबई अनुभवण्यास मिळावी यासाठी बस सेवा सुरु करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेऊन रविवारच्या सुट्टीसाठी बस सेवा सुरु करण्यासाठी लवकरच परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाईल,असे उत्तर आयुक्त बांगर यांनी विचारे दिले आहे. त्यामुळे येत्या काळात एनएमएमटीद्वारे नवी मुंबई अनुभवण्यास मिळणार आहे.

  नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, रो-रो सेवा अशी एक ना अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. यासह कोपरखैरणे येथे मियावाकी प्रकल्प आकारास येत आहे. त्यामुळे येथे जैव विविधता वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशी पक्ष्यांचा अधिवास येथे पाहण्यास मिळतो. यासह ज्वेल ऑफ नवी मुंबई , देशातील सर्वात मोठा ग्रँड सेंट्रल मॉल, बेलापूर किल्ला, पर्यटकांना येथील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. मात्र नवी मुंबईतील विविध प्रकल्पांबाब माहिती नसल्याने नक्की नवी मुंबईत आहे तरी काय? कसे पहायचे? त्या ठिकाणी कसे पोहोचायचे असे अनेक प्रश्न पर्यटकांना पडतात.

  पर्यटनाच्या दृष्टीने पालिकेकडून कोणतीही माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली नाही त्यामुळे पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी खासदार राजन विचारे यांनी नुकतेच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईत ज्याप्रमाणे रविवारी बस चालविली जाते त्याप्रमाणे ‘नवीमुंबई दर्शन’ बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.

  खासदार विचारे यांच्या मागणीची नवी मुंबई महापालिकेने तातडीने दखल घेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मुंबईदर्शन’ डबलडेकर बस सेवेप्रमाणेच ‘नवीमुंबई दर्शना’ साठी आठवड्यातील रविवारच्या सुट्टीसाठी बस सेवा सुरु करण्यासाठी लवकरच परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाईल असे खासदार विचारे यांना कळविले आहे.

  नवी मुंबईतील पर्यटन स्थळे
  सीवूडस येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर, देशातील सर्वात मोठा ग्रँड सेंट्रल मॉल, नेरुळ येथील वंडर्स पार्क, सानपाडा येथील सेन्सरी उद्यान, बेलापुर येथील पारसिक हिल, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेली व्हॅली पार्क, विकसित होत असलेला बेलापूर किल्ला, डॉ. डी वाय पाटील स्टेडियम, वाशीतील जुहू चौपाटी, एनआरआय येथील खाडीत येणारे फ्लेमिंगो पक्षी, दिवाळे गावाची प्रसिद्ध जेट्टी, घणसोली येथील गवळीदेव, सुलाईदेवी, कोपरखैरणे येथील विकसित होत असलेले मियावाकी जंगल, ऐरोलीतील फ्लेमिंगो दर्शन यासह शहरातील अनकोत्तम उद्याने व त्यातील सुविधा ,बेलापूर येथे होणारे मेट्रो व नवी मुंबई विमानतळ देखील पर्यटकांना पाहता येणार आहेत. यासह पालिकेला शेजारील खारघर येथील सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्ट व पांडवकडा देखील पर्यटकांना दाखवता येऊ शकतो.