नवी मुंबईची वाटचाल ४ एफएसआयच्या दृष्टीने, आ. मंदा म्हात्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आ. मंदा म्हात्रे (MANDA MHATRE) यांनी नवी मुंबईला (NEW MUMBAI) ४ एफएसआय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. १६ ऑक्टोबर रोजी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आ. म्हात्रे व पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पालिका, सिडको व शासनाच्या उच्चाधिकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नवी मुंबईला ४ एफएसआय कशा पद्धतीने देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली होती.

नवी मुंबई : नवी मुंबई शहराची (NMMC) वाटचाल ४ एफएसआय मिळण्याच्या दृष्टीने सुरू असून प्रशासन दरबारी देखील या कामास वेग आला आहे. आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नवी मुंबईला (NEW MUMBAI) सध्या वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर ४ एफएसआयची गरज असल्याचे सांगत ४ एफएसआयची मागणी केली होती. याबाबत कायम पाठपुराव केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. मंदा म्हात्रे, सिडको उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी ,आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक लावत समिती गठीत करण्यात आली होती. या बैठकीत केल्या गेलेल्या सूचनांच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याने इतिवृत्ताला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईचे ४ एफएसआयच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे.

आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईला ४ एफएसआय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. १६ ऑक्टोबर रोजी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आ. म्हात्रे व पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पालिका, सिडको व शासनाच्या उच्चाधिकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नवी मुंबईला ४ एफएसआय कशा पद्धतीने देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत करत येत्या आठ दिवसांत नियोजन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिडकोकडून याबाबत तातडीने हालचाली करत नवी मुंबई पालिकेच्या सहाय्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे. त्यामुळे नवी मुंबईला ४ एफएसआय मिळण्याच्या दृष्टीने शासन दरबारी बळकटी प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित केले गेलेले मुद्दे

# आमदार मंदा म्हात्रे यांनी बैठकीत नवी मुंबई पालिका क्षेत्रातील जुन्या मोडकळीस मालेल्या सिडकोने बांधलेल्या इमारतीच्या पुनर्बाधणी किंवा पुनर्विकासासाठी किती चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे शक्य आहे. याबाबत सिडकोने सव्हेक्षण करावे अशी विनंती केली होती. प्रस्ताव सादर करणे योग्य राहील. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत सिडकोने दहा दिवसांत शासनाच्या नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. नगर विकास विभागाच्या सचिवांनी ही बाब नमूद करून घेतली होती.

# नवी मुंबई क्षेत्रातील जुन्या व मोडकळीस आलेल्या परंतु सिडकोने बांधलेल्या इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास हा सिडकोच्या माध्यमातून करण्यासाठी सिडकोची स्वतंत्र पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास शाखा सुरू करून त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबवणे सुकर होईल असे या बैठकीत सिडकोचे उपाध्यक्ष डॉ. राबवणेसंजय मुखर्जी यांनी सुचवले होते.

# जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बाधणी व पुनर्विकास हा सिडकोच्या माध्यमातून केल्यास सिडकोला त्याचा अधिक लाभ सिडकोला होईल. तसेच त्यांच्या आर्थिक क्षमतेमध्ये वृध्दी होईल व पुनर्बांधणी व पुनर्विकासाचे प्रस्ताव हे अधिक वेगाने पुर्ण होऊन सर्व संबंधित रहिवाशांना त्याचा लाभ होईल असे पालकमंत्री व नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचवले होते. यावर मुख्यमंत्र्यांचे सल्लागारांनी जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास हा सिडकोच्या माध्यमातून करावा असे या बैठकीत सुचवले होते.

नवी मुंबईतील धोकादायक व इमारतींचा प्रश्न देखील यामुळे निकाली निघणार आहे. इमारतींच्या पुनर्विकासाकरिता शासनाने अडीच चटई क्षेत्र यापूर्वीच मंजुर केलेला आहे. परंतु अडीच एफ.एस.आय. पुरेसा नसल्याने पुनर्विकासासाठी ४ चटई क्षेत्र दिल्यास विकासक व रहिवाशी या दोघांच्याही हिताचे होणार आहे. इमारतींचा पुनर्विकास करताना चांगल्या प्रतीचे उत्तम बांधकाम करणाऱ्या विकासकाची आवश्यकता आहे. शापूरजी पालनजी, एल अॅण्ड टी,टाटा तसेच बी.जी.शिर्के यांसारख्या नावाजलेल्या विकासकांसारखी नेमणूक करून इमारतींचा पुनर्विकास केल्यास रहिवाशांना दर्जेदार व मोठी घरे मिळू शकणार आहेत. तसेच रहिवाशांची फसवणूकही होणार नसून सिडकोचे यावर नियंत्रण असल्याने सिडको व पालिकेमार्फत सर्व परवानग्या मिळवणे देखील विकासकांना सुकर होणार आहे.

मी राष्ट्रवादीत असतानाही जनतेच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला होता व सध्याही आवाज उठवत आहे. जर आपण जनतेची कामे करण्यात अपयशी ठरणार असून तर आमदार म्हणून मिरवण्याला अर्थ राहणार नाही. ४ एफएसआय लागू होण्यासाठी कायम पाठपुरावा केला असून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या इतिवृत्तावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या योजनेला वेग आला आहे. हे सामान्य नागरिकांच्या हितासाठीचे काम आहे. श्रेयासाठी मी हे करत नसून यात कोणीही अडथळे आणू नयेत.