नाले सफाई कामात हलगर्जीपणा, ठेकेदारावर कारवाईची मागणी

भिवंडी - भिवंडी शहर महानगरपालिका कार्य क्षेत्रात असलेले नाले सफाई करण्याचा ठेका पालिका प्रशासनाने खाजगी ठेकेदरास दिला आहे.सुमारे एक कोटी५१ लाख रूपये खर्च करणाऱ्या पालिका प्रशासनाचे ठेकेदारावर

भिवंडी –  भिवंडी शहर महानगरपालिका कार्य क्षेत्रात असलेले नाले सफाई करण्याचा ठेका पालिका प्रशासनाने खाजगी ठेकेदरास दिला आहे.सुमारे एक कोटी५१ लाख रूपये खर्च करणाऱ्या पालिका प्रशासनाचे ठेकेदारावर कामा बाबत योग्य नियंत्रण नसल्याने नाले सफाई कामामध्ये दिरंगाई होऊ लागली आहे.नाले सफाई कामात हलगर्जीपणा अर्धवट झाल्याने भिवंडीत पुरपरिस्थीती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.घाणीचे सामा्ज्य असलेल्या नाले सफाई करत असलेल्या कामगाराचे सुरक्षितेसाठी कोणत्याही उपाययोजना ठेकेदारा कडुन करण्यात आलेल्या नाहीत. त्या मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिका प्रशांसन व ठेकेदारांच्या दुर्लक्षित पणामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पालिका आयुक्त डॉ. प्रवीन आष्टीकर महापौर प्रतिभा पाटील व कामगार अधिकारी यांनी या बाबत लक्ष घालून संबधीत ठेकेदारावर शासकीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. 

भिवंडी शहरा मध्ये पुर परिस्थिती निर्माण होऊ नये या साठी  पालिका  प्रशासनाने ठेकेदारा मार्फत शहरातील नाले सफाई कामे सुरू केले आहे. मात्र सर्व अनियंत्रित काम सुरू आहे.नाल्यातील कचरा-गाळ काढण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगाराचे आरोग्य सुरक्षितेसाठी त्याना तोंडाला मास्क हातमोजे,पायात गमबुट, आँक्सिजन सिंलेडर साधन साहित्य सारखे ठेकदाराने उपलब्ध करून देणे नियमानुसार आवश्यक आहे.मात्र ठेकदाराने नियमाकडे सराईत पणे दुर्लक्ष करून कामे सुरू केल्याने कामगाराचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.  प्रभाग समिती क्र१  झा . पी . एड कंपनी उल्हासनगर (३५ लाख २० हजार ९८६) प्र.स.२ मे . मेसर्स बुबेरे एड असोसिएट्स  (३४ लाख ९१ हजार ४३४ रुपये )   प्र.स.३ मे  सागर कन्ट्रक्शन  उल्हासनगर (२४ लाख ४५ हजार ८०० रुपये ) प्र.स.४ मेसर्स बुबेरे एड असोसिएट्स  (३१लाख ९६ हजार ६९३)प्र . स  ५  मे  सागर कन्ट्रक्शन  उल्हासनगर (३० लाख ७७ हजार ६३० रुपये )  असा एकूण सुमारे एक कोटी ५८ लाख ३२ हजार ५४३ रूपयाचा ठेका पालिका प्रशासनाने दिला आहे.विशेष म्हणजे याच ठेकेदारांनी गेल्या वर्षी नाले सफाई अर्धवट केल्याने शहरात पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली होती.असे असताना काही नगरसेवकांचे दबावा मुळे यंदा पुन्हा त्यांनाच पालिका प्रशासनाने ठेका दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.

  महानगरपालिकेचे १ ते ५ प्रभाग समीती अतंर्गत असलेल्या ९० वार्डा माध्ये १८ किमी अंतराचे १०३ गटार-नाले आहेत. अनेक ठिकाणी कंत्राटदाराने नाल्यातील कचरा गाळ काढुन  नाल्या शेजारी ठेवला आहे.तो तेथेच पडुन असल्याने त्यास दुर्गंधी सुटली आहे.बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरीकांना नाक मुठीत धरून रस्त्यावरून ये – जा करावी लागत आहे.  शहरातील दर्गाह रोड, कारीवली रोड, नारपोली, ठाणे रोड, निजामपुरा, मंगळ बाजार स्ल्यँब, साईबाबा नाका, कणेरी, म्हाडा कॉलनी, चाविंद्र रोड, गैबी नगर, शांतीनगर, समदनगर अशा विविध भागात लहान-मोठे नाले आहेत.नाले सफाई कामांवर देखरेख करण्यासाठी प्रभाग अधिकारी व बांधकाम विभागाचे शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र ते कामा कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.