भिवंडीत विहीरीमध्ये नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

भिवंडी: निजामपुरा परिसरातील घासबाजार काली स्कुलच्या पाठीमागील तबरेज आसिफ कुंबले यांच्या तबेल्यालगत असलेल्या पावकर विहिरीत नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.या घटनेची

 भिवंडी: निजामपुरा परिसरातील घासबाजार काली स्कुलच्या पाठीमागील तबरेज आसिफ कुंबले यांच्या तबेल्यालगत असलेल्या पावकर विहिरीत नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आल्याने अथवा मातृत्व लपवण्यासाठी अर्भक फेकले असावे, असा कयास लावला जात आहे. ही खळबळजनक घटना निदर्शनास येताच पोलीस शिपाई शकील शिकलगार यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी भादंविच्या कलम ३१७ अन्वये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.फेकलेले नवजात अर्भकाचे पालनपोषण नाकारण्याच्या हेतूने अथवा अनैतिक संबंध लपवण्याच्या हेतूने अर्भक फेकले असावे, असा दाट संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करीत आहेत.