कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम

कल्याणची सागर कन्या म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणच्या डॉली पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी हिने मोठी मजल मारली आहे.

    कल्याण : ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरणपटू श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी. सागरी अंतर ३ तास ४३ मिनिटात पोहून पूर्ण केले. कल्याणची सागर कन्या म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणच्या डॉली पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी हिने मोठी मजल मारली आहे.

    श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सुजाता सानप आणि स्विमिंग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील उपस्तित होते. रुपाली रेपाळे यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.