sachin waze

सचिन वाझे(sachin waze) राहात असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स इमारतीच्या सोसायटीला एनआयएने सीसीटीव्ही आणि डीव्हीआरबाबत पत्र दिले. तेव्हा एक वेगळाच गौप्यस्फोट झाला.

    ठाणे : मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या घरासमोर जिलेटीन कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली.ही कार ज्याच्या नावावर होती त्या मनसुखची हत्या(mansukh hiren murder case) करण्यात आली. सचिन वाझे यांचे या प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड झाले. हा सगळा प्लॅन कुणाचा ? याचा शोध घेत असतानाच दुसरीकडे तपास यंत्रणेचे मात्र ‘वराती मागून घोडे’ असल्याचे चित्र दिसत आहे.

    सचिन वाझे राहात असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स इमारतीच्या सोसायटीला एनआयएने सीसीटीव्ही आणि डीव्हीआरबाबत पत्र दिले. तेव्हा एक वेगळाच गौप्यस्फोट झाला. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी सचिन वाझे यांच्या घराचे आणि सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज, नंबरप्लेट बनविणाऱ्या दुकानदार नवीन तलरेजा यांच्या सद्गुरू डेकोर या दुकानातून त्यांची नंबरप्लेट बनविणाऱ्याची नोंद असलेली डायरी, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर घेऊन गेल्याची कबुली दिली. एनआयए पुरावे गोळा करीत असतानाच पूर्वीच मुंबई पोलिसांनी ते पळविले असल्याचे समजते. यामुळे हे पुरावे  नक्की गेले कुठे आणि पोलिसांपैकी ते नेले कुणी? हा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.