कल्याणात कचराकुंडीत सापडली नवजात बालके; उपचाराकरिता डॉ. झबक दाम्पत्य धावलेत मदतीला

एकाच आठवड्यातील दोन वेगवेगळ्या घटनामधुन माणसातील इवल्याशा जिवाला मरणाच्या दाढेत ढकलून देणाऱ्या प्रसंगामुळे ममत्व कुठे हलपले असा सवाल उभा ठाकला आहे. एकाच आठवड्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी कल्याण डोंबिवली शहर हळहळले आहे.

    कल्याण (Kalyan).  काच आठवड्यातील दोन वेगवेगळ्या घटनामधुन माणसातील इवल्याशा जिवाला मरणाच्या दाढेत ढकलून देणाऱ्या प्रसंगामुळे ममत्व कुठे हलपले असा सवाल उभा ठाकला आहे. एकाच आठवड्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी कल्याण डोंबिवली शहर हळहळले आहे.

    डोंबिवलीत समांतर रस्त्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास खाडीवरील एका खडकावर दोन चिमुकले आढळून आले होते .स्थानिकांनी तत्काळ या दोन्ही चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढत पोलिसना माहिती दिली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या मुलांच्या माता पित्याचा शोध सुरू केला .या दोन्ही मुलांच्या वडिलांचा शोध लागला असला तरी अद्याप आई मात्र सापडलेली नाही. त्यांच्या आईने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे . ही घटना ताजी असतानाच गेल्या आठवड्यात गुरुवारी कल्याण पूर्वेत कचऱ्याच्या कुंडीत एक दिवसाचे जिवंत पुरुष जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले. मनसे कार्यकर्त्यांनी या गोंडस बाळाला तातडीने कल्याण पश्चिमेकडील क्रिटिकेयर या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मागील चार दिवसापासून या बाळाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असून डॉकटर या बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत .दरम्यान या बाळावर होणाऱ्या उपचाराचा संपूर्ण खर्च रुग्णालयाकडून करण्यात येत असून या बाळाची प्रकृती सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ नितीन झबक यांनी दिली .

    या नवजात चिमुरड्याला मरणाच्या दाढेत सोडून देणाऱ्या निर्दयी पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही. ज्या वयात या चिमुकल्यांने आईच्या कुशीत श्वास घ्यावा त्या वयात या इवल्याशा जिवाला रुग्णालयत सुया टोचून घेत जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मायेची ऊब कुठे लोप पावली असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लोकडाऊन मध्ये ९ महिने स्वतःच्या उदरात या जिवाला वाढविणाऱ्या मातेला बाळाला जन्म दिल्यानंतरया तान्हुल्याला भर उन्हात सोडून देताना काहीच यातना झाल्या नसतील का असाच सवाल नागरिकांकडून विचारला जात असून अशा निर्दयी माता पित्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.आताच कलीयुगात आशा घटनेमुळे “माता ना वैरणी तु” अशी वक्ती त्या बाळाच्या घटनेतुन दिसत आहे.