shock to workers

भिवंडी(bhivandi) तालुक्यातील पडघाजवळ असलेल्या वाशेरा गावातील एका कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या ९ कामगारांना विद्युत वाहिनाचा शॉक(electric shock) लागल्याने ते कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील पडघाजवळ असलेल्या वाशेरा गावातील एका कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या ९ कामगारांना विद्युत वाहिनाचा शॉक(electric shock) लागल्याने ते कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भिवंडी तालुक्यातील वाशेरे गावाच्या हद्दीतील गोदामात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही. पडघा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे. तसेच सर्व नऊ जखमी कामगारांना भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विजेचा धक्का लागून ९ कामगार गंभीर घटना घडून ४० तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रान डा दिनेश वाघ राहणार दाभाड, अनंत दिवे ,विशाल भोईर व अजय निखंडे असे जखमी कामगारांची नावे आहेत.

भिवंडी तालुक्यातील एका कंपनीच्या गोदामात कामगार शनिवारी सकाळच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या हातून धातूची शिडी कंपनीतील उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात ते फेकले गेले. यावेळी काही कामगार भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक कार्यक्रते अशोक सापटे यांनी दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

या घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवले आहे. अशी माहिती पोलीस अधिकारी कोकाटे यांनी दिली आहे.