कल्याण डोंबिवलीमध्ये ९२ वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण डोंबिवलीतही चांगलाच वाढत चालला आहे. एकीकडे रुग्णसंख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे. तर त्यातील ११७६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला

 कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव कल्याण डोंबिवलीतही चांगलाच वाढत चालला आहे. एकीकडे रुग्णसंख्या अडीच हजारांच्या पुढे गेली  आहे. तर त्यातील ११७६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला  आहे . तर १३२८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ६६ जणांचा आतापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. असे असतानाही एक सकारात्मक बातमी आहे. कल्याणच्या निऑन हॉस्पिटलमधून ९२ वर्ष वयाच्या एका आजींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी कोरोनावर  मात केली आहे. वय काही असो इच्छाशक्ती प्रबळ असेल तर  कोरोनावर पण मात करता येऊ शकते हे, या आजींनी दाखवून दिले आहे.