मुरबाडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, मात्र मोठी वित्तहानी नाही

मुरबाड: निसर्ग चक्रीवादळाने मुरबाड तालुक्याच्या विविध भागाला जरी तडाखा बसला असला तरी या वादळात सुदैवाने फार मोठे नुकसान झाले नाही. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. निसर्ग

मुरबाड: निसर्ग चक्रीवादळाने मुरबाड तालुक्याच्या विविध भागाला जरी तडाखा बसला असला तरी या वादळात सुदैवाने फार मोठे नुकसान झाले नाही. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने मंगळवारीच सर्वत्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता.तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुरबाडमध्ये आज सकाळपासूनच संततधार सुरू असलेला पाऊस दुपारनंतर वाढला. साधारणतः दुपारी तीननंतर वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वादळात तालुक्यातील बळेगाव,  तिवारपाडा, वाल्हीवरे येथील घरांवरील पत्रे, कौले उडाली.मुरबाड शहरातील मातानगर येथेही पत्र्याचे शेड उडून नुकसान झाले आहे. तर तालुक्याच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. वादळाची तीव्रता अधिक जरी होती तरी सुदैवाने तालुक्यात फार मोठी वित्तहानी झाली नाही.