निसर्ग चक्रीवादळामुळे वित्त व जीवितहानी नाही – डोंबिवलीत १०-१२ झाडे पडली

डोंबिवली : निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वसाधारणपणे डोंबिवलीकर नागरिकांमध्ये घबराट होती. परंतु डोंबिवली आणि परिसर भागात वादळ न झाल्याने सर्वांना हायसे वाटले. शहर आणि ग्रामीण भागात चुटपुट घटना म्हणचे

 डोंबिवली : निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वसाधारणपणे डोंबिवलीकर नागरिकांमध्ये घबराट होती. परंतु डोंबिवली आणि परिसर भागात वादळ न झाल्याने सर्वांना हायसे वाटले. शहर आणि ग्रामीण भागात चुटपुट घटना म्हणचे १० – १२ झाडे पडल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागात कल्याण – शीळ रोडवर एक जाहिरात होल्डींग पडल्याची माहिती समोर येत आहे.
 
निसर्ग चक्रीवादळामुळे डोंबिवली खाडीकिनारी भागात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. सकाळपासून ध्वनीक्षेपणाद्वारे पालिका प्रशासनाने वादळाबाबतची माहिती नागरिकांना दिली होती. कोणीही घराबाहेर पडू नका, पत्राशेड तसेच जीर्ण इमारतीमध्ये राहू नका, विजेच्या तारां आणि खांब यापासून सावध रहा, घरातील विद्युत उपकरणे काही काळ बंद ठेवा अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. काल दुपारी २ वाजल्यापासून डोंबिवलीत वारे वाहण्यास सुरुवात होऊन नंतर पाऊस पडला मात्र  दुपारी ४ वाजल्यानंतर वाऱ्याची गती काही प्रमाणात वाढून पावसाचा जोरही होता. दरम्यान वाऱ्यामुळे शहरात, एमआयडीसी, गांधीनगर, सुनीलनागर, सारस्वतकॉलनी इत्यादी ठिकाणी १० – १२ झाडे उन्मळून पडली. महापालिकेच्या अग्निशमन दल ती बाजूला करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तर कल्याण डोंबिवलीत विद्युत वाहिन्यांवर झाडं पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान सायंकाळी साधारणपणे साडेपाच वाजता पाऊस थांबला आणि वाराही कमी झाला. पाऊस थांबल्यामुळे हवशे-नवशे लोकांना खाडीकिनारी फेरफटका मारून आनंद घेतला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही यामुळे डोंबिवलीकरांना हायसे वाटले.