कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनचा विचार नाही : पालिका आयुक्त

गेल्या १० दिवसापासून कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सोशलमिडियावर रंगली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत लॉकडाऊनचा प्रश्न निकाली काढत सध्या कुठलाही लॉकडाउन करण्याची स्थितिमधे महापालिका नाही. परंतु स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार , सलून चालक व कारागीर मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे अश्या दुकानदारांवर सक्त कार्रवाई करणे आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत (KDMC) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना शहरात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी काहींनी केली असून तर सोशल मीडियावर (Social media)  देखील पालिका क्षेत्रात लॉकडाऊन (Lockdown) लागू होणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांना विचारले असता, शहरात लॉकडाऊन करण्याचा विचार नसून दुकानदारांसह नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी (Controle to the corona virus) शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे, अन्यथा त्यांच्या सक्त कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे.

गेल्या १० दिवसापासून कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची चर्चा सोशलमिडियावर रंगली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत लॉकडाऊनचा प्रश्न निकाली काढत सध्या कुठलाही लॉकडाउन करण्याची स्थितिमधे महापालिका नाही. परंतु स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार , सलून चालक व कारागीर मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे अश्या दुकानदारांवर सक्त कार्रवाई करणे आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील ४ लाख ५० नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मिशन झीरोच्या अंतर्गत कोरोना टेस्ट, सामाजिक संस्था द्वारे एंटीजरन टेस्ट कॅप मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. आता महापालिकेची स्वतःची आईसीयू, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णांची आकडेवारी बरीच कमी होणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.