No train will stop at any station between Virar-Dahanu? Passengers to Hitendra Thakur to cancel the decision

विरार : अतिजलद गाड्यांसाठी अनेक उपनगरीय गाड्या, पॅसेंजर, शटल, मेमू आदी ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा घाट घातला जात आहे, तसेच विरार-डहाणूमधील थांबेच रद्द करण्यात येणार असल्याचेही समजते. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आमदार पिता-पुत्र हितेंद्र ठाकुर आणि क्षितीज ठाकुर यांची भेट घेवून रेल्वेचा हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

अतिजलद ट्रेनसाठी रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अनेक उपनगरीय गाड्या, पॅसेंजर, शटल, मेमू आदी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करून विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील थांबेच काढून टाकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. हा निर्णय अंमलात आल्यास या स्थानकांवरुन प्रवास करमाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

नव्या खासगी गाड्यांसाठी अनेक उपनगरीय गाड्या, पॅसेंजर, शटल, मेमू आदी ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा घाट घातला जात असून विरार-डहाणूमधील थांबेच रद्द करण्यात येणार असल्याचे समजते. हा निर्णय तडीस गेल्यास या पट्ट्यातील हजारो प्रवाशांना फटका बसेल.

शटल, मेमू, पॅसेंजर गाड्यांना वैतरणा, सफाळे, केळवे रोड, उमरोळी, वाणगाव तसेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर आणि आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या बोईसर हे एरवी लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये असणारे थांबे काढण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहारातून समोर आले आहे. या प्रकारामुळे आधीच डहाणू ते वैतरणा या पट्ट्यातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, प्रवासी संघटनेने खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडे हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा करून थांबे रद्द होऊ देणार नाही असे आश्‍वासन गावीत यांनी दिले होते.