आता बंगले पाडत आहात, नंतर कामगारांची घरे पाडाल; एन.आर.सी. कामगारांचा संतप्त सवाल

कल्याण (Kalyan) जवळील आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनी गेले तेरा वर्ष बंद पडलेली आहे. यामुळे सुमारे ३५०० कामगारांना बेकार झाले. कामगारांची थकीत देणीबाबत कामगार युनियनच्या माध्यमातून न्यायलीन लढाई सुरू आहे.

 कल्याण :  आता बंगले पाडत आहात आणि नंतर कामगार वसहतीमधील कामगाराची घरे पाडाल असा संतप्त सवाल करीत एनआरसी काॅलनी (NRC Colony) मधील बुधवारी बंगल्याचे (Bungalow) पाडकाम कामगारांनी बंद पाडले. कल्याण (Kalyan) जवळील आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनी गेले तेरा वर्ष बंद पडलेली आहे. यामुळे सुमारे ३५०० कामगारांना बेकार झाले. कामगारांची थकीत देणीबाबत कामगार युनियनच्या माध्यमातून न्यायलीन लढाई सुरू आहे.

कल्याण जवळ आंबिवली येथील नेशनल रेयॉन कॉर्पोरेशन (एनआरसी) ही कंपनीची सुमारे साढेचारशे एकर जमीन कंपनीच्या मालकीची होती. यामध्ये सुमारे सव्वाशे एकर जागेत कारखाना आणि वैभवशाली अशी शाळा, हँस्पीटल, मैदानासह आधिकारी कामगार काँलनी आणी अतिरिक्त जागेत होते. कंपनीबंद नंतर या परिसराला अवकळा आली. आपली हक्काची थकीत देणी मिळतील या प्रतिक्षेत काँलनीमध्ये आज देखील कामगार राहत असुन सदर कंपनी ही सुमारे १३ वर्षापूर्वी बंद पडली होती. या कंपनीची जागेची किंमत आज कोरोडोच्या घरात आहे.

रहेजा समुहाला ही बंद पडलेल्या एनआरसी कंपनीची अतिरिक्त जागा विकण्यात आली होती. गोयंका ग्रुपची ही जागा रहेजा सुमहाला सुमारे १६७ कोटीला विकण्यात आली असल्याचे समजते पण अनेक दिवस ही जागा अशीच पडून होती. कामगारांची देणी अजूनही बाकी आहेत. अशातच आदानी ग्रुपने या जागेबाबत स्वारस्य घेतले असल्याचे दिसते. एनआरसी कंपनीच्या काँलनीत कंपनी बंद पडल्याने बेरोजगार झालेले कामगार अजूनही रहातात. या कामगांरचे वीज व पाणी कनेक्शन मागे कापण्यात आले होते. अजूनही येथील कामगारांची देणी बाकी आहेत. त्यामुळे हे कामगार येथील घरे सोडण्यास तयार नाहीत.

बुधवारी एनआरसी काँलनीतील एनआरसी शाळे लगतच्या परिसरातील जेसीबीच्या साहयाने बंगले पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने वसाहतीतील कामगार तसेच महिला वर्ग परिसरातील एनआरसी कामगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त होत आता धोकादायक म्हणून बंगले पाडता नंतर कामगार वसहतीमधील कामगारांची घरे पाडाल, आमची देणी द्या मग काय करयाचे ते करा अशी भुमिका घेत हे पाडकाम कामगारांनी रोखले. पोलिसांचा फौज फाटा देखील यावेळी उपस्थित होता.

याठिकाणी उपस्थित असलेले आँल इंडिया इंडस्ट्रील जनरल वर्कर्स युनियनचे (आयटक) सचिव क्राँम्रेड उदय चौधरी यांनी सांगितले की, एनआरसी कंपनीच्या जागेतील रहेजा मार्फत विकासक आदानीने एनआरसी काँलनी मधील बंगले पाड कामची आर्डर नसताना का पाडत आहात. बंगले पाडकामाची आर्डर दाखवा, कामगार देणी संदर्भात न्यायालात दावा प्रलंबित आहे. मनपाच्या कराची थकबाकी असताना हे पाडकाम कसे सुरू आहे अशी भुमिका त्यांनी मांडली.