कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर नर्सेसची धडक – कमी वेतनावर राबवून घेतले जात असल्याचा केला आरोप

कल्याण : कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र काम करत असून यामध्ये डॉक्टर आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अशातच कोविडमध्ये काम करून देखील किमान वेतन देखील न देता केवळ ८ हजार

 कल्याण : कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच यंत्रणा दिवसरात्र काम करत असून यामध्ये डॉक्टर आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अशातच कोविडमध्ये काम करून देखील किमान वेतन देखील न देता केवळ ८ हजार पगारावर काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य केंद्रांवरील १९२ नर्सेसनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक दिली.

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्यात येत असून यामध्ये नवीन भरती होणाऱ्या नर्सेसला २५ हजार पगार देण्यात आला आहे. कित्येक वर्षे काम करून देखील आम्हाला ८ हजार पगार आणि नवीन भरती करणाऱ्या नर्सेसला २५ हजार पगार कसा काय असा सवाल करत केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला. आम्हला देखील २५ हजार पगार मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. नर्सेसच्या या प्रश्नाबाबत कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी मध्यस्थी करत आयुक्तांपुढे या नर्सेसची बाजू मांडली. तर आयुक्तांनीदेखील याबाबत सकारात्मकता दाखवत या नर्सेसला २५ हजार पगार देण्याचे मान्य केले.
 
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरची संख्या कमी पडते म्हणून केडीएमसीने या आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात भरती सुरु केली. यामध्ये नर्सेसला किमान वेतन २५ हजार देण्याचे ठरले. यामुळे एनयूएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या १९२ नर्सने आम्हाला केवळ ८ हजार पगारात राबवून घेत असून कोविड सेंटरमध्ये काम करून देखील आम्हाला सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी आपले म्हणणे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मांडले. तसेच आमदार गणपत गायवाड यांनी देखील या नर्सेसची मागणी आयुक्तांपुढे लावून धरली. यावेळी आयुक्तांनी या नर्सेसला २५ हजार वेतन देण्याचे मान्य केले आहे.