कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागात कोरोनाचा शिरकाव

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाने मनपाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाने शिरकाव केला. नंतर दोनच दिवसात

 कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाने मनपाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाने शिरकाव केला. नंतर दोनच दिवसात प्रशासकीय विभागातील एका उप आयुक्तासह, एका शिपायाला देखील कोरोनाची लागण झाल्याने  खळबळ उडाली आहे.

कोरोना संसर्गाला आळा बसण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असुन कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती नुसार प्रशासकीय विभागातील एका उप आयुक्त व एका शिपाई याला विभागात कार्यरत असलेल्या  या दोघांचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता आरोग्य विभागानंतर प्रशासकीय विभागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशाकीय यंत्रणेने आता आरोग्य विभागासह, प्रशासकीय विभागातील कर्मचारी यांना विशेष काळजी घेत सर्व सेफ्टी बाबीसह दक्षता घेऊन कोरोना योद्ध्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.