अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये : पालिका आयुक्तांचे आवाहन

महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर १५ दिवसातच करोनाचे संकट समोर उभे ठाकले यावेळी महापालिकेची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी होती. त्यामधून मार्गक्रमण करत करोनाचे संकट रोखण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख आमदार रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ शिंदे यांनी केला आहे

कल्याण : डोंबिवलीत (Dombivali)दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना परिषदेत लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर (Kalu Komaskar) यांच्या बरोबरच आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पालिका आयुक्त हटाव अशी मागणी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये असे आवाहन राजकीय नेत्यांना केले आहे.

महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर १५ दिवसातच करोनाचे संकट समोर उभे ठाकले यावेळी महापालिकेची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी होती. त्यामधून मार्गक्रमण करत करोनाचे संकट रोखण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख आमदार रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ शिंदे यांनी केला आहे. शासन केलेल्या कामाचे मूल्यमापन करत असते.

नागरिकांच्या सोयीसाठी रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत आमचे सगळे कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. आज पालिकेचे स्वतःचे १२०० ऑक्सिजन आणि २५० आयसीयू बेड तयार आहेत. माझ्याबरोबर माझे सर्व कर्मचारी अधिकारी रात्र दिवस काम करत आहेत त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वक्तव्य कृपया करू नका असे आवाहन पालिका आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी केले आहे.