kalyan panchayat samiti

कल्याण(Kalyan) पंचायत समिती कार्यालयातील महापुरुषांच्या तैल चित्रांना कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ टाकून देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

  कल्याण: कल्याण(Kalyan) पंचायत समिती कार्यालयातील महापुरुषांच्या तैल चित्रांना कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ टाकून दिल्याने संबंधित कार्यालयीन प्रमुखासह इतर अधिकाऱ्यांवर झालेल्या विटंबनाप्रकरणी कायदेशीर कारवाई(Action) करण्याचे संयुक्त निवेदन रिपाई ,मनसे ,संभाजी ब्रिगेड यांनी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनकडे केली आहे.

  कल्याण पंचायत समिती तालुक्याचा संपूर्ण कारभार या कार्यालयातून चालवीत असून कार्यालयाचे नव्याने नूतनीकरण करण्याचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. एकंदरीत विविध ११ विभागाचे खाते प्रमुख याठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी येथे कार्यरत असून काल सायंकाळच्या सुमारास कार्यालयातील महापुरुषांच्या भिंतीवरील तैल चित्रे काढून कचऱ्याच्या ठिकाणी टाकण्यात आल्या.

  याबाबत विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीच्या धोरणाबद्दल तीव्र निषेध नोंदवून रिपाईचे तसेच संभाजी ब्रिगेडचे कल्याण शहर अध्यक्ष सचिन घोडेकर यांनी पोलिसांना संयुक्त निवेदन देऊन विटंबना करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन पोलिसांना दिले आहे.

  मजुरांकडून अनावधानाने झाले असावे – श्वेता पालवे 

  कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांना याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की सर्व विभाग प्रमुखांना पत्र काढले असून त्याचा खुलासा देण्याचे सांगितले आहे. इमारत दुरुस्तीचे अंतर्गत काम सुरू असल्याने मजूर दिवस-रात्र काम करीत असल्याने अनवधनाने त्यांच्याकडून काम करीत असताना कदाचित हे घडले गेले असल्याची शक्यता वर्तविली जात हे हेतू पुरस्पर केले नसल्याचेही पालवे यांनी सांगितले.

  चौकशी 

  ठाणे जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांना या प्रकाराबाबत विचारणा केली असता मला याबाबत माहिती नसून, मात्र याबाबत आता निश्चित चौकशी करू असे सांगितले.