ऑन कॉल आपत्कालीन रिक्षा सेवा मीटर पद्धतीने सुरु करण्याची राष्ट्र कल्याण पार्टीची मागणी

कल्याण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागा तर्फे कल्याण डोंबिवली मध्ये ऑन कॉल आपत्कालीन रिक्षा सेवा सुरु करण्यात

 कल्याण : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागा तर्फे कल्याण डोंबिवली मध्ये ऑन कॉल आपत्कालीन रिक्षा सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र ही ऑन कॉल रिक्षा सेवा मीटर पद्धतीने सुरु करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी पालिका आयुक्त आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

ऑन कॉल रिक्षा सेवेमुळे नागरिकांना हॉस्पिटल तसेच इतर अत्यावश्यक कामासाठी जाण्यासाठी उपयोग देखील होत आहे. त्याबद्दल महानगरपालिका, परिवहन विभाग, पोलीस आणि रिक्षाचालक मालक यांचे राष्ट्र कल्याण पार्टीने आभार मानले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या समोर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे सर्वजण खूप काटकसर करताना आपल्याला दिसत आहे. आपत्कालीन वेळी ऑन कॉल रिक्षा सेवा घेताना नागरिकांना रिक्षा चालकांना जास्त प्रवास शुल्क द्यावे लागत आहे. रिक्षा चालक नागरिकांकडून प्रवास शुल्क मीटरप्रमाणे न घेता जास्तीचे भाडे घेत आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी लुट थांबविण्यासाठी ऑन कॉल आपत्कालीन रिक्षा सेवा मीटर पद्धतीने सुरु करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी पालिका आयुक्त आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच रिक्षा चालक व मालक यांनीदेखील अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.