kopineshwar darshan

प्रथमच महाशिवरात्रीच्या(mahashivratri) दिवशी कोपीनेश्वर मंदिर(kopineshwar temple) बंद असल्याचे पाहायला मिळाले. मात्र लोकांनी दर्शनासाठी(online darshan of kopineshwar) नवा उपाय यावेळी अवलंबला आहे. यावेळी फक्त ठाण्यातल्याच नव्हे तर परदेशातल्या भाविकांनीही ऑनलाईन दर्शनासाठी पुजाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला आणि कोपीनेश्वराचे दर्शन घेतले.

    वसंत चव्हाण, ठाणे: कोरोनाचा (corona)वाढता संसर्ग लक्षात घेता दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महाशिवरात्रीच्या उत्सवावर यंदा पाणी फिरले आहे. कारण ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिर(kopineshwar temple closed) यावर्षी बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर प्रशासनाने घेतला. त्यामुळे प्रथमच महाशिवरात्रीच्या दिवशी कोपीनेश्वर मंदिर बंद असल्याचे पाहायला मिळाले.मात्र लोकांनी दर्शनासाठी नवा उपाय यावेळी अवलंबला आहे. यावेळी फक्त ठाण्यातल्याच नव्हे तर परदेशातल्या भाविकांनीही ऑनलाईन दर्शनासाठी पुजाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला आणि कोपीनेश्वराचे दर्शन घेतले.

    संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘महाशिवरात्री उत्सव’ यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिर ट्रस्टने घेतला होता. मागील वर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाली आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला होता, दरम्यान नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर कोरोनाचे नियम शिथील होताना दिसत होत. मात्र अचानक रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गर्दी होऊ नये, नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी कोपीनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महाशिवरात्रीचा उत्सव यावर्षी कोरोनामुळे साजरा झाला नाही. शासनाने लावलेल्या निर्बंध लक्षात घेता प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत. गर्दी होऊ नये म्हणून या वर्षी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र ओळखीच्या भाविकांचे सकाळपासून व्हिडिओ कॉल सुरू आहेत. ठाण्यातूनच नव्हे तर परदेशातूनदेखील व्हिडिओ कॉल येत आहेत. आम्ही फोनवरून लोकांना ऑनलाईन दर्शन घडवत आहोत.

    - विनायक गाडे, सदस्य, कोपीनेश्वर मंदिर ट्रस्ट

    ठाण्यातील बाजारपेठेमधील कोपीनेश्वर मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. राज्यभरातील नव्हे तर परदेशातील ठाणेकर नागरिक आवर्जून महाशिवरात्रीला उपस्थित राहून कोपीनेश्वराचे दर्शन घेत असतात. सर्वात मोठी पिंड पाहण्यासाठी भाविकांची गर्दी देखील असते. मात्र कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या उत्सवाला खंड पडला आहे.