One dies due to negligence of MSEDCL sj

महावितरणच्या हरगर्जीपणाचा हा बळी असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळालेल्या व गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शरीफ यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महावितरणने उचलावा अशी मागणीही जोर धरत आहे. तार पडलेल्या ठिकाणी शुक्रवारी  बोअर मशीन ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिली होती.

पालघर : बोईसरमधील बैलपाडा संतोषी नगरस्थित असलेल्या युनियन बँक एटीएमजवळ जिवंत वीज प्रवाह असलेली तार (electric wire) अंगावर पडल्याने ( falls directly on body) या घटनेत २२ वर्षीय रोहित विश्वकर्माचा भाजून मृत्यू झाला. तर भैय्यापाडा येथील ३५ वर्षीय मोहित शरीफ गंभीररित्या भाजला. गंभीर असल्याने शरीफ याला मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

महावितरणच्या हरगर्जीपणाचा (MSEDCL)  हा बळी असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जळालेल्या व गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शरीफ यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महावितरणने उचलावा अशी मागणीही जोर धरत आहे. तार पडलेल्या ठिकाणी शुक्रवारी  बोअर मशीन ट्रकने विजेच्या खांबाला धडक दिली होती. त्यामुळे येथील तार तुटली.ही तार जोडणी करण्यासाठी  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बोअर मशीनमालकाकडून २५ हजार रुपये घेतल्याचे आरोप होत आहेत. तांत्रिक दृष्ट्या या तारा व्यवस्थित रित्या जोडणी न झाल्याने तार पुन्हा कोसळल्या व हा अपघात घडला. दरम्यान या दोघांच्याही खर्चासाठी सहायता निधी प्रस्तवित केला जाणार असल्याचे महावितरण मार्फत सांगण्यात आले आहे.

महावितरणच्या बोईसर मंडळाचे उप कार्यकारी अभियंता रुपेश पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी घटनेबाबत बोलणे टाळले.याउलट स्वतःचे खापर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरवर फोडून त्यांनी या घटनेची चौकशी केल्यानंतरच काय ते समोर येईल असे सांगितले.