कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक – एकाच दिवशी तब्बल १८५ रुग्णांची नोंद

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल १८५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात मागील २४ तासात सर्वाधिक तब्बल १८५

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल १८५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात मागील २४ तासात सर्वाधिक तब्बल १८५  नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १९११ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला असून ९३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ९२३ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.