कल्याण डोंबिवलीत १३५ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग सहाव्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १३५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग सहाव्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १३५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यूदेखील झाला आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर इंदिरानगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि कल्याण पूर्वेतील कैलास नगर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीत मागील २४ तासात तब्बल १३५ नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १३५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २५९३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असून ११७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १३२८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.