कल्याण डोंबिवलीत १५५ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या २४५८

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग पाचव्या दिवशीदेखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १५५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग पाचव्या दिवशीदेखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १५५ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये टिटवाळा येथील ५८ वर्षीय पुरुषाचा कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल १५५ नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १५५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २४५८ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६४  जणांचा मृत्यू झाला असून १०९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १२७८  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.