कल्याण डोंबिवलीत १३१ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या २३०३

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग चौथ्या दिवशीदेखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १३१ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग चौथ्या दिवशीदेखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरीचा आकडा पार केला असून आज एकाच दिवशी तब्बल १३१ रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यूदेखील झाला आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील ७८ वर्षीय आणि डोंबिवली पश्चिमेतील ५४ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू हा टाटा आमंत्रा या विलगीकरण कक्षात झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल १३१ नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १३१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २३०३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ६२  जणांचा मृत्यू झाला असून १०३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ११८५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.