पोलिसात दाखल गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाची हत्या , सहा जण अटक

भिवंडी :भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील गैबिनगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्याची घटना घडली असून या हत्यातील सहा आरोपींना काही तासात ताब्यात घेत हत्ये प्रकरणी गुन्हा उघडकीस आणण्यात

भिवंडी :भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील गैबिनगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्याची घटना घडली असून या हत्यातील सहा आरोपींना काही तासात ताब्यात घेत हत्ये प्रकरणी गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले  आहे .

शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयत मोहम्मद अक्रम अकबर वय ४८ हे घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यास ईस्तेखार याने रस्त्यात अडवून त्याच्या भाऊ अख्तर सय्यद याच्या विरोधात पुतण्या शेहबाज याने पोस्को अंतर्गत गुन्ह्यातील तक्रार मागे घे ,त्या गुन्ह्य मुळे माझ्या भावाचा  न्यायालयात जामीन होत नसल्याने धमकावले असता ,मोहम्मद अक्रम अकबर याने जे व्हायचे ते कोर्टात होईल असे बोलले असता ईस्तेखार सय्यद यास या बाबत राग येऊन त्याने  अबुशमा सय्यद उर्फ अम्मू , इस्माईल अन्सारी, इब्राहिम अन्सारी,इस्राईल अन्सारी ,वसीम उर्फ शेरू या आपल्या ओळखीतल गैरकायद्याची मंडळी जमा करून आपापसात संगनमत करून फिर्यादी मोहम्मद अक्रम अकबर हे त्यांचे राहते घरी जात असताना आरोपी ईस्तेखार याने फिर्यादी मोहम्मद अक्रम अकबर अली अन्सारी ,वय ४८ वर्षे यांना साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण करीत फिर्यादीचे दोन्ही पायावर,डाव्या हातावर लोखंडी रॉडने मारून दोन्ही पाय व डावा हात फ्रॅक्चर करुन गंभीर मारहाण करून जखमी अवस्थेत टाकून पोबारा केला होता .

जखमी मोहम्मद अक्रम अकबर अली अन्सारी यास उपचारा करीता दाखल करीत त्याच्या तक्रारी वरून मारहाणीचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल असतानाच अतिरक्तस्त्रावा मुळे जखमी अक्रम अकबर अली अन्सारी याचा मृत्यू झाला असून त्यांच्या विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे