कल्याण डोंबिवलीत आज आढळले १६० नवे रुग्ण

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल १६० रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील आज सलग  दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल १६० रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. यामध्ये कल्याण पूर्वेतील ६५ वर्षीय पुरुषाचा आणि मोहने येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.  केडीएमसी क्षेत्रात मागील २४ तासात तब्बल १६० नवीन रुग्णांची भर पडली असून आजच्या या १६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २०७१ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला असून ९६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १०४३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.