onion gift

महिलांच्या शिष्टमंडळने कांद्याच्या माळा गळ्यात घालून उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत येत उप विभागीय अधिकारी यांना कांद्याची टोपली भेट देऊन केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचा निषेध केला.

भिवंडी : कांदा निर्यात बंदीने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत असताना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला भिवंडी शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळने (NCP women against the ban on onion exports) कांद्याच्या माळा गळ्यात घालून उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत येत उप विभागीय अधिकारी यांना कांद्याची टोपली भेट (Onion gift) देऊन केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचा निषेध केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस भिवंडी शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जावेद फारुकी , आसिफ खान ,अनिसा पटेल ,ललिता पांचाळ ,ख्वाजा बी हलीम हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.