नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात, दिवसभरात केवळ ९४ नव्या रुग्णांची नोंद

नवी मुंबईत(Navi Mumbai) आज फक्त ९४ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली आहे. तसेच आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

    नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये(Navi Mumbai) कोरोना रुग्णसंख्येत(Corona Patients) घट झाली आहे. नवी मुंबईत आज फक्त ९४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कोरोना मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. नवी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १.४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    जानेवारी २०२१ ते मे २०२१ या ५ महिन्यांच्या काळात ४५,७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४९३ जणांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांत २.४% इतका मृत्यूदर नोंदवला गेला.आता नवी मुंबईत दिवसाला कोरोणा रुग्णसंख्या १०० च्या आत आली आहे. तर शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या ५५० वरून ७० वर आली आहे.