निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करून देण्याची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. या वादळाचा फटका अनेक गोरगरीब नागरिकांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीने नुकसान केलेल्या घरांचे पंचनामे करून

पनवेल  : निसर्ग चक्रीवादळाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. या वादळाचा फटका अनेक गोरगरीब नागरिकांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीने नुकसान केलेल्या घरांचे पंचनामे करून घरांची दुरुस्ती महापालिकेने करून द्यावी  अशी मागणी  पनवेल महानगरपालिलेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पालिकेकडे केलेली आहे.

     ३ जून रोजी  झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अनेक घरांची  पडझड झाली. तर अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे  हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका अनेक गोरगरीब नागरिकांना बसला आहे. पत्रे फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले होते. पनवेल शहरातील अशोकबाग लोखंडीपाडा येथील नवनाथ बबन खांडपेकर, फशी शिवराम पाटील, सुभाष प्रकाश डिंगीया, शैलेश कुणा घरत या रहिवाश्यांच्या  घरांचे नुकसान झाले  आहे.

     या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या घरांचे लवकरात लवकर  पंचनामे करून घरांची दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी देखील पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.