ऑक्सिजन तुटवड्यामुळे बळींची संख्या थांबेना,  ठाण्यात वेदांत रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू

ठाण्याच्या वर्तकनगर येथील कोविड निर्देशित खाजगी वेदांत रुगणालायत सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    ठाणे – ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. इतक्या घटना घडूनही अजूनही ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. ठाण्याच्या वर्तकनगर येथील कोविड निर्देशित खाजगी वेदांत रुगणालायत सोमवारी चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    Oxygen shortage will not stop the death toll, 4 die at Vedanta Hospital in Thane

    या सर्व प्रकरणानंतर आता राजकीय नेत्यांची रुग्णालयात भेट देण्यासाठी गर्दी झाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन चौकशी करून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनीही रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचे हे मृत्यु असल्याचा आरोप केला असुन सकाळीच ऑक्सिजन संपला असताना रुग्णालयाकडुन ठाणे मनपा प्रशासनाला कळवले नसल्याचे म्हटले आहे.
    रुग्णालयाच्या खाली रुग्णांचे नातेवाईक तसेच मनसे , भाजपचे पदाधिकारी जमले असून रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.