पडघ्यात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांना तहसीलदारांची नोटीस

भिवंडी: तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.१०१/१ या सरकारी जमीनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम केले आहे. भुमाफिया येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे

भिवंडी: तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सर्वे नं.१०१/१ या सरकारी जमीनीवर भुमाफियांनी अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम केले आहे. भुमाफिया येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करून एक रूम अडीच ते तीन लाख रुपयांना ग्राहकांना विकत असल्याचे समोर आले आहे.या विरोधात स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी ,प्रांत अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अहवालानुसार पडघा येथील पाच भूमाफियांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून जमीन अनधिकृतपणे बिनशेती उपयोगात आणल्याने व अतिक्रमण करून सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याने नोटीस बजावली आहे. सात दिवसांत हे अतिक्रमण स्वतःहून दूर करावे, असे नोटीसमध्ये सांगितले आहे. मुदतीनंतर कुठलीही पूर्वसुचना न देता शासकीय खर्चाने हे अतिक्रमण दूर करुन अतिक्रमण भूमाफियांकडून खर्च वसूल करुन बिनशेती दंडाची रक्कम महसूल थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असेही नोटीसीत नमुद केले आहे.तहसीलदारांनी बजावलेल्या या नोटीसीमुळे पडघा येथील अतिक्रमणधारक भु माफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून नोटीसची मुदत संपल्यानंतर तहसीलदार शशिकांत गायकवाड काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.