पडघा येथे मनसेचे हॉर्न वाजवून आंदोलन

भिवंडी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य सरकार विरोधात हॉर्न वाजवुन आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले असुन या अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील पडघा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने हाॅर्न

भिवंडी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य सरकार विरोधात हॉर्न वाजवुन आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले असुन या अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील पडघा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने हाॅर्न वाजवुन आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन काळात रिक्षा,टेम्पो,ट्रक,ओला, उबेर सर्व चालक मालकांवर उपासमारीची वेळी आली आहे. मात्र सरकारने कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत न करता जाणुन बुजून  दुर्लक्ष केल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हाॅर्न  वाजवा आंदोलन पडघा येथे करण्यात आले. यावेळी मनसे वाहतूक प्रदेशचे अध्यक्ष संजय नाईक,मनसे प्रदेश उपाध्यक्ष डि.के.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी ,जिल्हा संघटक रविंद्र विशे, जिल्हा वाहतूक संघटक रोहीदास पाटील, माथाडी तालुका अध्यक्ष गुरुनाथ मते,वाहतूक भिवंडी उपसंघटक रमेश ठाणगे,मनसे उपाध्यक्ष दयानंद पाटील तर मनसेचे आदी उपस्थित होते.