पालघरमध्ये कोरोनाचा १९ वर्षीय रुग्ण, जिल्ह्यात कंटेनमेंट झोन जाहीर

वाडा: पालघर तालुक्यात एका १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. पालघर तालुक्यात एकूम ११ रुग्ण तर डहाणू तालुक्यात ८ अशी रुग्ण संख्या असून एकाचा मृत्यू झाला आहे. पालघरमधीलरुग्ण

 वाडा: पालघर तालुक्यात एका १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. पालघर तालुक्यात एकूम ११ रुग्ण तर डहाणू तालुक्यात ८ अशी रुग्ण संख्या असून एकाचा मृत्यू झाला आहे. पालघरमधील रुग्ण सफाळे येथील रहिवासी असून जसलोक रुग्णालयात दाखल होता या रुग्णाची कोरोना तपासणी खाजगी लॅबमध्ये केली असता आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येते.

पालघर तालुक्यातील त्या गावात खबरदारीचा उपाय म्हणून या अत्यावश्क सेवा वगळता या भागातील जाणे येणे बंद केले आहे.तसेच गाव परिसरतील ३ किमीचा कंटेनमेंट झोन ५ किमी अंतर परिसर बफर झोन तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. एकंदरीत आजपर्यंत पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये ८ व पालघर तालुका ११ (१ मृत) वसई विरार महानगर पालिका-९३ (६ मृत) व जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात एकुण आकडेवारी ११२ रुग्ण पॉझिटिव्ह असून यात ७ मृत आहेतअशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येते.
तर पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोन जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिक या क्षेत्रापासून दूर राहून कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यास मदत मिळेल, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील य पालघर  व डहाणू या तालुक्यातील काही क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत .यात  गाव पाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आली आहेत.
या उपरोक्त प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये  उपोद्घातातील अ.क्र. येथील नमुद दि.१७/०४/२०२० रोजीच्या राज्य शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमुद केलेल्या सवलती लागू राहणार नाहीत व या बाबीवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागू राहतील. सदरच्या प्रतिबंधात्मक सुचनांची तंतोतंत अमलबजावणी करण्याची सर्व संबंधित विभाग दक्षता घेत आहेत तसेच  कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झालेल्या क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे बाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला आदेशित केलेले आहे. त्यानुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था हे  आवश्यक ती कार्यवाही करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. हे आदेश हे  पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.