प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर हालचाली करू नये – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पालघर : पालघर जिल्हयात मागील दोन आठवडयात मोठया प्रमाणात कोविड -१९ विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या

पालघर : पालघर जिल्हयात मागील दोन आठवडयात मोठया प्रमाणात कोविड -१९ विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेत. या  पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी शिंदे यांनी केलं आहे.जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिबंधत क्षेत्र आणि इतर विषयावर आढावा बैठक आज घेण्यात आली . यावेळी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हे या क्षेत्रात अॅक्टीव  सर्वेलन्स करण्यासाठी  शिक्षक , स्वयंसेवक यांची मदत घेणार आहेत.  प्रतिबंधित क्षेत्रातल्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग एनसीसी ,एनएसएसची मदत घेणार असून अत्यावश्यक सेवा विषयक इतर कोणतीही हालचाली या क्षेत्रात होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे  प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर  हालचाली न करणेबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.कोरोना विषाणूचा संपर्क झालेल्या रुग्णांना जर इतर जोखमीचे आजार असल्यास अशा रुग्णांना डीसीएचसीमध्ये दाखल करावे अशी सूचना जिल्हाधिकार यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत ग्रामीण भागातल्या बहुतेक उद्योग , आस्थापना सुरु झाल्या आहेत. या सर्व ठिकाणी मास्कचा वापर , हॅण्ड वॉश स्टेशन , सॅनिटायझर , सामाजिक अंतर आणि आरोग्य सेतूचा अँपचा  वापर करणं बंधनकारक आहे . याबाबत सर्वस्तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.पालघर जिल्हयातल्या प्राथमिक , माध्यमिक शाळा तसचं आश्रमशाळा सुरु करण्याबाबत  शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) यांनी मुख्यालयात उपस्थित असलेल्या शिक्षकांचा आढावा घ्यावा.विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचं वाटप वेळेत करावं. टप्पानिहाय शाळा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. सर्व शाळांचे आणि आवारांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत संबंधिताना  सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळा सुरु झाल्यांनतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसाठी थर्मल स्कॅनर उपलब्ध करुन घेणे, हॅन्ड वॉश स्टेशन तयार करणेबाबत आदी सूचना देण्यात आलेल्या आहेत . त्याचप्रमाणे शाळा सुरु झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर , मास्क वापर करण्याविषयी शाळाना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.