पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ३९३० वर

पालघर: पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५० नव्या रुग्णाची भर पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या आता ३९३० वर पोहचली

पालघर: पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५० नव्या रुग्णाची भर पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या आता ३९३० वर पोहचली असून आतापर्यंत ११७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या २०६२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातली असून तिथे कोरोनाने ३००० चा टप्पा ओलांडला आहे. तिथे आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पालघर ग्रामीण भागात सद्यस्थितीत १७५ इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.