पालघरमधील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर, जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पोझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून आज संध्याकाळी

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पोझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत  भरच पडत चालली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतच चालली असून आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ९७ वर पोहचली आहे. तर ९७ पैकी ५ जणांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्याच्या आकडेवारीतील या ९७ पैकी वसई तालुका( वसई  विरार महानगरपालिका क्षेत्र ) – येथील ८० रुग्ण असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पालघर तालुक्यात १० कोरोनाबाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्याच ७ जण कोरोना बाधित आहेत. जिल्ह्यातल्या ७८२ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.