पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०६ वर

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतचं चालली असून आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोना

पालघर : पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत चालली आहे. प्रत्येक दिवशी ही संख्या वाढतचं चालली असून आज संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १०६ वर पोहचली आहे. तर १०६ पैकी ६ जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण १०३ कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी पालघर तालुक्यातले १० रुग्ण असून १ जणाचा मृत्यु झाला आहे. डहाणु तालुक्यात ८ रुग्ण आहेत. तर उर्वरित ८८ रुग्ण हे वसई विरार क्षेत्रातले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजुन जिल्ह्यातल्या ७२२ जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.